У вашего броузера проблема в совместимости с HTML5
कोल्हापूर (प्रतिनिधी):कोल्हापूर येथील दसरा चौक येथे आज बहुजन समाज क्रांती मोर्चा काढण्यात आला.या मोर्च्यात भरपूर संख्येने बहुजन समाजातील लोक उपस्थित होते.भाषणानंतर मुलींच्या हस्ते निवेदन पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
हा मोर्चा सकाळी ११.३० च्या दरम्यान सुरु झाला.गेला १ महिना या मोर्च्याची तय्यारी सुरु होती.आज या मोर्च्यास २८८ संघटनानी पाठींबा दिल असून यात मराठा-कुणबी, मुस्लीम, १२ बलुतेदार, ओबीसी, भटके मुक्त, लिंगायत, ख्रिश्चन,बौद्ध समाज सामील होते. संपूर्ण महाराष्ट्रात या मोर्च्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
मागण्या:
१.अॅट्रोसिटी कायदा आणखी कडक करण्यात यावा.
२.ओबीसी आरक्षणाला धक्का नलावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
३. भटक्या विमुक्त समाजाला हि अॅट्रोसिटी कायद्यात संवरक्षण मिळावे.
४.कोपरडी हत्याकांड मधील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.