#yesNewsMarathi #solapurNews #narendramodi #BJP
सोलापूर : सोलापूरच्या पार्क मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे वेध लागले आहे. याठिकाणी 20 हजार खुर्च्या लावण्यात येत आहेत. स्टेडियम आणि खुर्च्या यावर सुमारे 50 हजार लोक बसतील अशी व्यवस्था केली जात आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी सोलापुरचे सुंद्री वादक भिमण्णा जाधव सुंद्री वाजवणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन मुंबईच्या मानसी सोनटक्के या करणार आहेत. सभेच्या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा, पंतप्रधान कार्यालयासाठी वायफायची सुविधा केली जात आहे. रंगरंगोटी, बॅरीकेटींग, साफसफाई यामध्ये महापालिकेचे कर्मचारी गुंतले आहेत.
सोलापूर विमानतळ ते सभेच्या ठिकाणापर्यंत चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या मार्गावर विविध कामे सुरू आहेत. या मार्गावर उत्कर्ष हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल आणि फौजदार चावडी जवळील मुळे हॉस्पिटल याठिकाणी प्रत्येक पाच इर्मजन्सी बेडची व्यवस्था आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. सातरस्ता येथील व्हीआयपी विश्रामगृहात पंतप्रधानांसाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. विश्रामगृह पाण्याने धुवून घेतला जात आहे. एकुणच सर्वच सरकारी यंत्रणा पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दिवसरात्र राबत आहेत. 11 विविध अशा एजन्सीकडून पंतप्रधानांच्या प्रत्येक हालाचालींवर लक्ष ठेवले जात आहे. पहा मोदींच्या दौर्याची ही सोलापूरकरांची तयारी...
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com/
Facebook:- https://www.facebook.com/yesnewsmarathi/
Twitter:- https://twitter.com/yesnewsmarathi
★Contact us★
mobile- 9881748329
Email:-
[email protected]
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.