Friday, 31 July, 2026г.
russian english deutsch french spanish portuguese czech greek georgian chinese japanese korean indonesian turkish thai uzbek

пример: покупка автомобиля в Запорожье

 

5 हजार रूपये द्या अन् खरेदी विक्री करा

5 हजार रूपये द्या अन् खरेदी विक्री कराУ вашего броузера проблема в совместимости с HTML5
सोलापूर - सोलापुरातील खरेदी विक्री कार्यालयात सावळा गोंधळ असून 5 हजार रूपये द्या अन् प्लॉट खरेदी करा, अशी मनमानी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची यातून फसवणूक सुरू झाली आहे. ज्या इमारतींना बांधकाम परवाना नाही. तसेच वापर परवाना नाही. अशा मिळकतींची खरेदी विक्री करू नये, असे पत्र महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी काढले असून यामध्ये अंतिम लेआऊट असल्याशिवाय खरेदी विक्री करू नये, अशी अट नसल्यामुळे उपनिबंधक कार्यालयात असे दस्त बिनधास्तपणे नोंदवले जातात. यामुळे लाखो रूपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे. वास्तविक पाहता शहर हद्दीमध्ये नगररचना तसेच महापालिकेचे नियम लागू असताना गुंठेवारीच्या नावाखाली मनमानी खरेदी विक्री सुरू आहे. गुंठेवारी भागामध्ये अनेक बांधकामांना महापालिकेची बांधकाम परमिशन नाही. असे असताना अशा मिळकतीची खरेदी विक्री पैशाची देवान-घेवाण करून सुरू आहे. यामुळे त्या जागेचा महापालिकेचा अंतिम लेआऊट मंजूर आहे. अशाच जागांच्या ओपन प्लॉटची खरेदी विक्री करावी, असे आदेश काढले तरच स्मार्ट सिटीचा उद्देश सफल होणार आहे.
Мой аккаунт